
मुंबईत रोज हजारो रेल्वे आणि लाखो प्रवासी देशाच्या विविध भागातून ये जा करतात. रेल्वेच्या या प्रवासासाठी रेल्वेकडून मुंबईत विविध ठिकाणी आरक्षण सुविधा उपलब्ध केली आहे. पण आरक्षण केंद्रांचे लांबच लांब रांगा हे वैशिष्ट्य बनत आहे. आता तर हिवाळी सुट्टीच्या कालावधीत हया रंगासाठी रात्रीचं येवून बसावं लागतं , त्यातच सामान्य नागरीकाबरोबर केंद्रावर रेल्वेचे पोलीसही दिसू लागले आहेत, पण हे सुरक्षा किंवा नियंत्रणासाठी नाहीत तर चक्क तिकिटासाठी.
मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस, कुर्ला टर्मिनस, बांद्रा टर्मिनस, अधेरी, घाटकोपर, मानखुर्द, वाशी आणि पनवेल या आरक्षण केंद्रावर तिकिटासाठी रोज मोठ्या रांगा लागतात. याच रांगा मध्ये आरपीएफ आणि जीआरपी चे जवान दादागिरी करताना दिसतात. कधी पोलिसी खाकीत तर कधी साध्या वेशात हि मंडळी दलालांचे दलाल बनून काम करत असल्याचे सर्रास दिसून येते. जर एखाद्या माणसाने त्यांना प्रतिप्रश्न केल्यास त्याला धमकावले जाते. काहीवेळा तर इतर सहकारी घेवून लाठ्यांनी बदडले जाते. हि मंडळी स्वत: साठी तिकीट खरेदी करत असतील तर ठीक होते पण यांचे लागेबांधे रेल्वेच्या दलालांशी असल्याचे खात्रीलायक समजते. आधीच रेल्वे दलालांकडून कंटाळलेल्या प्रवाशांना आता हया नव्या पोलिसी दलालाकडून नाहक त्रासाला सामोरे जावे लागतं आहे.
बुकिंग क्लार्कला तिकिटामागे ५०रुपये बोनस .
आता तर आरक्षण केंद्रावरच्या बुकिंग क्लार्कला प्रत्येक तिकिटामागे ५० रुपयाचा बोनस रेल्वे दलालांकडून मिळत असल्याचे सूत्राकडून समजते. त्यामुळे आरक्षण खिडकी उघडण्यापुर्वीच हव्या असलेल्या तिकिटांची यादी मिळालेली असते. मग क्लार्क समोरील प्रवाशाला प्रतीक्षा यादी (वेटिंग)चे कारण देतो. समोरच्याला तिकीट नाही मिळेना आपल्याला तिकीटा मागची कमी तर मिळते ना , आणि सरकारी पगार तर आहेच.
रेल्वे तिकिटांचा काळाबाजार
काही आरपीएफ आणि जीआरपीच्या जवानांना आता तिकिटांचा हा खेळ अवगत झाल्याने आरक्षण केंद्रांच्या एका कोपऱ्यात अधिकचे पैसे देवून तिकीट विकली जात आहेत. तसेच महत्वाच्या स्टेशनची तिकिटे थेट खरेदी करून चढ्या भावाने गरजू प्रवशांना दिली जातात हा खेळ एक्सप्रेस सुटण्याच्या काहीतासापुर्वी सुरु असतो. यामुळे या जवानांना घसघशीत कमी होत असल्याने आपले कर्तव्य विसरून आरक्षण केंद्राच्या जवळच ड्युटी मागून घेतली जाते.
आरक्षण केंद्रावर वेटिंग; दलालाकडे कन्फर्म तिकीट
आरक्षण केंद्रावर तासनतास रांगेत राहून प्रतीक्षा यादीचे तिकीट मिळते तर त्यानंतर दलालाकडे चौकशी केल्यास त्याच ट्रेन चे कन्फर्म तिकीट देण्याचे दलाल काबुल करतो. हा विरोधाभास का ? असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडतो आहे. ये सगळे व्यावहारिक संबंधाशिवाय शक्य नाही.
आरक्षण केंद्रावर वेटिंग; दलालाकडे कन्फर्म तिकीट
आरक्षण केंद्रावर तासनतास रांगेत राहून प्रतीक्षा यादीचे तिकीट मिळते तर त्यानंतर दलालाकडे चौकशी केल्यास त्याच ट्रेन चे कन्फर्म तिकीट देण्याचे दलाल काबुल करतो. हा विरोधाभास का ? असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडतो आहे. ये सगळे व्यावहारिक संबंधाशिवाय शक्य नाही.
ऑनलाईन बुकिंग सदैव "फुल"
ऑनलाईन बुकिंगमुळे घरातून इंटरनेटद्वारे सगळे सोपे झाले खरे पण तिकीट फुल चा नवा फंडा येथेही सामान्यांना फुल बनवत आहे. ऑनलाईन बुकिंग सुरु होताच काही सेकंदात आरक्षण फुल झाल्याचे प्रकार वारंवार होत असल्याने आता हया मार्गावर पण दलालांची वीत नजर असल्याचे खाजगीत बोलले जाते.
अधिकचे वेटिंग; प्रवाशांचे हाल
कोकणात जाणाऱ्या गाड्यांना अधिकचे वेटिंग दिल्याने ८ तास उभे राहून प्रवास करण्याची वेळ येते. हे वेटिंग एवढे असते कि एक अतिरिक्तबोगी जोडूनही माणसे उरतील. जनशताब्दी सारख्या किमान २ महिने आधीच आरक्षित झालेल्या एक्सप्रेस मध्ये सतत वेटिंग मधील अधिकच्या प्रवाशांना प्रवास करावा लागतो. नेत्रावती, कोकणकन्या,दिवा -सावंतवाडी, आदि गाड्या मध्ये तिकीट निरीक्षकांना लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. काही वेळा हि भांडणे हाणामारी पर्यंत गेल्याची उदाहरणे आहेत. कधी कधी गर्दी बघून तिकीट निरीक्षक काढता पाय घेत फक्त ए सी मधेच हवा घेत बसतात आणि प्रवाशी मात्र जिथे जागा मिळेल तिथे बसून प्रवास करतात. अयोग्य नियोजन हि भारतीय रेल्वेची ख्याती होत चालली आहे.
No comments:
Post a Comment