पेटलेलं जग आणि माझं मन !!!
एकदा वाचून बघाच ; माझा म्हणना काय आसा ता, कळातच तुमका !!
Friday, January 11, 2019
Friday, September 29, 2017
पुन्हा असा प्रसंग नको तर एवढं कराच
पुन्हा असा प्रसंग नको तर एवढं कराच,
...तर यासाठीही प्रभुच कारणीभूत ठरले असते!
अरे ज्यांनी एका ट्वीट वर तान्हुल्याला धावत्या ट्रेनमध्ये दुधाची बाटली उपलब्ध करून दिली. माझ्या एक व्हॉटसऍप मेसेजवर सिंधुदुर्गातील सामाजिक कार्यकर्त्याच्या अंतिम संस्कारासाठी ट्रेन थांबविली आणि त्यांचे ते विधी लवकर पार पाडले. अशा या आणि अनेक घटना सुरेश प्रभू यांच्या जनताभिमुख कार्याची पोच पावती आहे. (मी काही प्रभू किंवा सरकारचा चाहता नाही, पण चांगल्याचं कौतुकसार आणि वाईटावर प्रहार केल्याशिवाय राहत नाही. )एवढचं नाहीतर रेल्वेचा विकास आणि रेल्वेची गती वाढविण्याचे कार्य जेवढं प्रभुनी केलं, तेवढं आजतागायतच्या रेल्वे मंत्र्यांनी ते करायचं सोडाच, त्याचा विचार देखील केला नसेल. तरीही प्रभू रेल्वेच्या विविध अपघातांना जबाबदार कसे? पण तसे असेल तर मग आजच्या परळ एल्फिस्टन जोडणाऱ्या रेल्वेच्या पादचारी पुलावरील मृत्यूच्या तांडवाला पियुष गोयलच जबाबदार आहेत. कारण रेल्वेच्या कोणत्याच कामात शिस्त दिसत नाही. या पुलाचा प्रश्न आता उद्भवलेला नाही तर तो बरीच वर्षे रेंगाळलेला आहे, जसे परळ टर्मिनस, असो! रेल्वेच्या पुलाबद्दल बोलायलाच नको, कारण परळच्या बाजूने या पुलावर दोन जीने आहेत, ज्यात मोठा जिना म्हणजे एकावेळी फक्त तीन-तीन माणसे एका एका पायरीवरून चढू शकतील किंवा उतरू शकतील. तर त्याच्याच बाजूला छोटा अरुंद जिन्यातून फक्त एकच माणूस वर चढू शकेल, जर दुसरा माणूस उतरत किंवा चढत असेल तर धक्काबुक्की ठरलेलीच. असे काहीसे रेल्वे पूल म्हणजे दादार सेंट्रलचे क्रमांक एक आणि दोन फलाट. तर कुर्ल्याचे सगळेच पूल अरुंद आणि केव्हाही अपघात होतील असे. प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी हार्बर लाईनला चुनाभट्टीच्या दिशेने एक ब्रिज बांधला त्या जिन्याचा भाग एवढा अरुंद आहे की फक्त एकावेळी दोघेजण चढतील आणि ट्रेन आली कि महिला आणि पुरुष यांची धक्काबुक्की सुरु होतेच. तसेच माटुंगा सेंट्रलसह मुंबईतील अनेक रेल्वे स्टेशन आणि विशेष म्हणजे लोकलसोबतच मेल एक्सप्रेस धावणाऱ्या ठाणे आणि पनवेल स्टेशनवरील ब्रिजची अवस्था अत्यंत वाईट अशीच. त्यातल्या त्यात नवी मुंबईची हार्बर आणि ट्रान्स हार्बरवर सिडकोची मेहरबानी. नाहीतर रेल्वेचे सगळे ब्रिज आणि रेल्वे अधिकारी मोठ्या दुर्घटनेची वाटच बघत आहेत की काय अशी परिस्थिती आहे. कारण अधिकारी कर्मचारी बाजूला पुढे येतात ते मंत्री, असो। हा एक भाग झाला.
पण एका अर्थाने या दुर्घटनेकडे जर डोळसपणे पाहिलं तर असं लक्षात येईल की, आपण सगळी माणसं तरीही जो तो स्वतःच जीव वाचविण्यासाठी पळत होता. आणि पाळताना त्याने दुसऱ्या माणसांचा आणि त्यांच्या जीवाचा विचार केला नाही. त्यामुळे या दुर्घटने मागचं प्रार्थमिक कारण म्हणजे स्वार्थी वृत्ती आणि दुसरा कुणीही आहे याचा विचारच ना करणे, मी आणि फक्त मी. नाहीतर कितीही माणसं या ब्रिजवर आली असती तरीही प्रत्येकाचा विचार प्रत्येकाने केला असता तर सगळे वाचले असते कुणाला खरचटलं किंवा धक्काही लागला नसता. हा उपदेश करणं सोप्पं आहे राव, पण हे करणार कोण? असं विचारून चालणार नाही जर आपण परिस्थितीनुसार वागलो नाही तर असेच होत राहणार. कारण आजही आपण छोट्या छोट्या गोष्टी, नियम, कायदे आणि अगदीच काय सुरक्षिततेचे उपायही मोडीत काढतो. म्हणजे बघा ना ट्रेन मध्ये चढताना, उतरताना. सीट मिळविताना. अगदीच उभं राहताना देखील धक्काहा देतोच. रेल्वे स्टेशन आणि रेल्वेत कचरा टाकणे, थुंकणे, सीटवर पाय पसरून बसने, विंडो सीट मिळाली तर खिडकीतून पिचकारी मारणे, दरवाज्यात राहून दरवाज्याच्या मागील बाजूस थुंकणे असे अनेक प्रकार सुरू असतात. त्यामुळे यापुढे काही नियम स्वतः पाळायला हवेत आणि दुसऱ्यांकडून पाळून घ्यायला हवेत. कोणत्या परिस्थिती कसं वागलं पाहिजे हे शिकलं पाहिजे आणि शिकवलं पाहिजे. शालेय अभ्यासक्रमात मुल्य शिक्षणाबरोबरच आपत्कालीन परिस्थितीत कोणती जबाबदारी पार पाडावी हे शिक्षण अति महत्वाचं आहे. तेव्हाच अशी संकटकाळी मदत करणारे अनेक हात निर्माण होतील. त्यासाठी कोणत्या मदत पथकाची गरज नसेल किंबहुना आजची घटना पुन्हा घडणारच नाही.
पण एवढंच करून आपली जबाबदारी संपत नाही. आपण कुणावर अन्याय करणार नाही आणि आपल्यावर अन्याय झाला तर त्या विरुद्ध बोलायला हवे, रेल्वेची काम झाली नाहीत तर त्यांना जाब विचारायला हवा. निवडणुकीत मतदान नाही तर मताचा अधिकार वापरायला हवा. लोक प्रतिनिधीला त्याच्या कर्त्यव्याची जाणीव करून द्यायला हवी. पोलीस, अधिकारी, सरकार आणि कुणीही व्यक्ती नियम तोडत असेल तर ते थांबवायला हवं, आवाज उठवायला हवा. असं केलं तरच चांगली कामे होतील, अरुंद रस्ते , ब्रिज आणि गैरसोयीचे कोणतेच काम होणार नाही. जे होईल ते समाज हिताचे, त्यामुळे स्वार्थी वृत्ती सोडा आणि दुसऱ्यांचा विचार करा. तरच दुसरं तुमचा विचार करतील. पण असे असले तरी अशा दुर्घटनांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या जबाबदार असलेले अधिकारी, कर्मचारी, व्यक्ती शोधा आणि त्यांना शिक्षा करायला सरकारला भाग पाडा. रेल्वे अपघातांची जबाबदारी स्वीकारून जसा सुरेश प्रभू यांनी राजीनामा दिला तसाच राजीनामा रेल्वेचे ब्रिज बांधण्यास चालढकल करणाऱ्या अधिकाऱ्याकडून घ्यायला विसरू नका. त्यामुळे तुमचे गेलेले कुटुंबीय परत येणार नाहीत किंवा तुमच्या जखमाही भरणार नाहीत, एक निश्चित होईल ते म्हणजे अशी घटना पुढे घडणार नाही.....
Monday, August 7, 2017
आमचो निलो, 'झीटीव्ही'वर इलो....
तो इलो... तेका बघितला... तेनी जिंकून घेतला सगळा, आमचो निलो झालो आता फ्लिमस्टार!

*असो आमचो निलो म्हणजे दुसरो तिसरो कोण नाय तर, तोच तो *निलेश निर्मला सदानंद पवार! Nilesh Pawar*मध्यम बांधा, सडपातळ शरीर यष्टी, उंची साधारण पाच साडेपाच फूट, गहू वर्ण, कुरळे केस, डोळ्यावर चष्मा आणि तरी कानी नाकी डोळी उत्तमच.... अशी ही दूरदर्शनची (आपण यांना पाहिलंत का ?) ओळख.
कणकवली तहसीलदार हापिसात अव्वल कारकून *निर्मला पवार* आणि पंचायत समितीतले अधिकारी *सदानंद पवार* यांचा ह्या दुसरा अपत्य. पहिलं अपत्य अभिषेक फिश्रीमध्ये नोकरेक, मुबैक स्थायिक आसा म्हणजे मुबैचो चाकरमानी, तेचो सामाजिक आणि धार्मिक चळवळीत मोठो हातभार आणि तिसरा अपत्य सगळ्यांचा लाडक्या पिंक्या अर्थात सोनल. ह्या पण वेंगुर्ल्याक दिला, पण मुबैकच रवता. तसा जरी असला तरी पिंक्याक सगळ्या गोष्टींची भारी हौस. भाई म्हणजे निल्यावर तेचो खूप जीव आणि तेच्याप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम, नाटका आणि गाण्याची तेका खूप आवड. ता पण सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक चळवळीत सगळ्यात पुढे.
हि दोघा थोडी निल्यापेक्षा येगळी भावंडा, पण दोघांपेक्षा निलो ल्हानपणापासूनच थोडोसो धुंडवाळी आणि तितकोच हुरहुन्नरी. असो ह्यो निलो अधना-मधना अंगातले अॅकटिंगचे रंग दाखवत होतो. पण तेवा तेका तितक्यासा कुणी सिरीयसली घेव नाय. (कारण आज झी मराठीची 'सिरीयल' मिळाक हवी म्हणान आसात कदाचित.) शाळेपासूनच भाषणाची आवड आणि गमती करुची तेका खूप सवड. तेवा शाळेपासून अगदी कॉलेजसरान बरीच वर्षा झाली, तरी त्याची नाटका काय संपाक नाय. निल्यानं त्याच्यात खूपशी सर्टिफिकेटा मिळवल्यान देखील. ट्रॉफी आणि चषक तर आजही आपापली जागा फिक्स करून आसत, कणकवलीतल्या साफल्यमधल्या कपाटावर आणि शो केसात (गमती गमतीत तेनी बहीण पिंक्या उर्फ सोनल पवार आत्ताची सोनल कृष्णदर्शन जाधव हिका खूप पीडल्यानं, ता सगळा आता माका ऐकून घेवचा लागता, कधी दिवसा तर कधी रात्री) असो!
रत्नागिरी आजोळ असलेल्या निल्यावर आजी आजोबांचो भारी जीव, आज तेचा कौतुक बघूक आजोबा नाय रवले, पण नक्कीच तेंका सगळ्यांपेक्षा जास्त आनंद झालो असतो. आजीक तर निल्याचो भारी अभिमान, तसोच तो मामा मामीचोदेखील लाडकोच. हेचि मोठी मामी रत्नागिरीत हेड मास्तरीन, तेव्हा भाचानं केलेली खिचडी चोर #मास्तराची भूमिका मामीच्या जिव्हारी लागली. दुसऱ्या दिवशी शाळेत जावची पंचायत. पिडब्लूतल्या मोठ्या मामानं शाबासकीची थाप देऊन भाचाचा गोड कौतुक केल्यानं, तर तेच्या आणखी एका संतोष मामानं सिरियलच्या आधीच तेच्याबरोबरचो सेल्फी व्हायरल केल्यानं, बहुतेक "आनंद पोटात माझ्या मायेना..." असो निल्याचा भारी कौतुक सागळ्यांका तसाच ता आमका पण. त्यामुळेच तेचे प्रोमो आमच्यापासून काय लपान रवाक नाय.
सध्या मात्र जेवा पासून तो रात्रीअपरात्री देवगडाक गाडी घेवन जाय, तेवापासून आमच्या जीवक घोर लागलो होतो. *पण जेवा झी मराठीवर मास्तर आणि सुगंधाचो प्रोमो झळाकलो, तेवा जीव भांड्यात पडलो. आमचो निलो, 'झीटीव्ही'वर इलो आणि एक सणसणीत कानशिलात बसता, तशी बऱ्याच जणांची तोंडा बंद झाली. * कारण त्याच्या या मेहनतीवर खूप जणांच्या शंकाकुशंका सुरु होत्या. निल्याच्या अचूक टायमिंग, परफेक्ट अभिनय आणि दमदार इंटरीमुळे आता तेंचि बोलती बंद झाली आणि गावात गजाली सुरु झालेत. घराघरात आणि आपल्या माणसांच्या मनामनात निल्याचो मास्तर आणि तेचे गजाली सद्या सगळा गाव गाता हा! अगदी चांदयापासून बांद्या पर्यंत....

निल्याचो स्वभाव थोडोसो शांत तसो थोडो आक्रमक आणि काहींसो चंचल. कॉलेज संपल्यावर तेका दूरदर्शनचा काम मिळाला, ता देखील खूप प्रयन्त करून. नंतर हळू हळू खय सांस्कृतिक कार्यक्रम, तर खय सामाजिक आणि धार्मिक चळवळीत तेनी जिल्याततच नाय तर जिल्याभायर आपली छाप पडल्यानं. तर शिंधुदुर्गाच्या आकाशवाणीवर तेच्या आवाजाची वेगळी जादू अजुनय तग धरून आसा. आताच निल्यानं आम्ही भारतीय यांच्या प्रसिद्ध नाटककार संजय पवार लिखित 'अधांतर' या नाटकातसून आणि मैत्री पार्क पुरळ यांच्या 'राजा' या एकांकिकेसून उत्कृष्ट अभिनयाचा बक्षीस घेतल्यानं, शिंधुदुर्ग आणि रत्नागिरीपर्यंत सगळे एकांकिका गाजयल्यानं तेनी. मध्यंतरी तेनी सुरु केलेल्या आवाजाच्या कलासेसचो पण जोर होतो, या सगळ्याचो तेका उपेक झालो. अनेक चढउतारानंतर तेचि आयुष्याची आणि अभिनयाची घडी व्यवस्तीत बसता हा.
मात्र आज तेच्या संयमशील स्वभावामुळे तेच्यातलो #मास्तर अधिकच बहरलो आणि सागळ्यांका आवडता हा. तर सांगाची गोष्ट अशी की ह्यो निलो आमच्या पूर्णांगिणीचो भाव म्हणजे माझो साख्खो मेवणो. पण आम्ही या नात्या पेक्षा थोडे वेगळेच आसो, मित्र म्हणून आम्ही खूप जवळ आसो. मग तेचे गजाली मी नाय बघणार आणि सांगणार तर दुसरो कोण ? *आमचो निलो, 'झीटीव्ही मराठी'वर इलो....* आता तुमी पण बगा आणि माका सांगा, बगणार ना #गावगातागजाली बुधवार ते शनिवार रात्री साडे नव वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.... #GavGataGajali
*- कृष्णदर्शन*
Wednesday, August 31, 2016
बांधिलकी मिडियाची आणि दादागिरी मस्तवाल मेहतांची !

महाडमधील
महाघात...मंत्र्यांमधील मेहता... आणि मिडियामधील मिलिंद असे हे ‘मिस्ट्री 3
एम’ प्रकरण नेमके आहे तरी काय ? आणि मी कृष्णदर्शन
जाधव, एक माध्यमकर्मी म्हणून त्याचा शोध, बोध
आणि वेध घेण्याचा एक छोटासा प्रयत्न..
महाडमधील महाघात:
माध्यमांची बांधिलकी आणि पीसीआरची हतबलता:
तारिख : 2 ऑगस्ट, वेळ : रात्री11:30ची मंगळवारी कोकणच्या सावित्री नदीतील
महापूरात मुंबई-गोवा महामार्गावरील ब्रिटीशकालीन पुल वाहून जातो काय? आणि
या दुर्घटनेत महाड - पोलादपूर दरम्यानच्या पुलासह वाहून गेलेल्या एसटी
महामंडळाच्या 2 बसेस आणि अन्य वाहानांसह अनेक अपघातग्रस्तांच्या संख्येचा
आकडा फुगत जातो काय? वर वर नैसर्गिक आपत्तीसारखी वाटणारी दुर्घटना म्हणजे
अवघ्या महाराष्ट्रावर मंगळवारच्या मध्यरात्री झालेला हा एक आघात होय. परंतु
या घटनेच्या अनुषंगाने माध्यम प्रतिनिधी म्हणून मला हा निसर्गाचा आघात
नाही तर सरकारी अनास्थेचा बळी वाटतोय, त्यामुळेच हा निसर्गाचा आघात नाहीतर
बेजबाबदार सरकार घटीत महाडमधील हा महाघात आहे.
माध्यमांची बांधिलकी आणि पीसीआरची हतबलता:
घटना कोणतीही असो, त्याचे वृत्तांकन सुरू करणारी प्रसारमाध्यमं आज यात महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. सहाजिकच महाड पुल दुर्घटनेची बातमी अगदी जलद गतीने माध्यमांपर्यंत पोहचली तशीच ती राज्याचे मुख्यमंत्री महोदय आणि सामान्य जनतेपर्यंतही पोहचली. कार्यक्षम मुख्यमंत्री आणि आत्पत्कालीन स्थितीची जाण असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ घटनेची माहिती घेत बचाव आणि मदत कार्यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लावली. मात्र प्रत्यक्षदर्शींनी 100 क्रमांकावर फोन केला असता तो का लागला नाही, याची चौकशी होईल का? असो! स्थानिकांच्या माहितीनुसार साधारणपणे पहाटे हे बचाव कार्य सुरू झाले. माध्यमांचे प्रतिनिधी पहाटेपासूनच या घटनेचे वृत्तांकन करू लागले. मात्र मुंबई, दिल्ली येथील माध्यमांच्या स्टुडीओतून घटनास्थळाच्या ब्रेकिंग न्यूज सुरू असतानाच; अपघातग्रस्त भागाचे अर्थात रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश मेहतांचा मोबाईल कनेक्ट करण्यासाठी सतत पीसीआरकडून प्रयत्न होत होता. मात्र यावेळी नॉट रिचेबलच्या उत्तराने विविध चॅनेलच्या पीसीआरचे ड्युटी इन्चार्ज हैराण आणि हतबल झाले होते.
बेजबाबदार मेहता:
बुधवार, दिनांक 3 ऑगस्ट, वेळ सकाळी 9च्या दरम्यान अखेर मेहतांचा संपर्क झाल्यानंतर या बचाव आणि मदत कार्य सुरू असल्याचा फोनो त्यांनी दिला...तोपर्यंत माध्यमांनी पोहचवलेल्या बातम्यामुळे अपघातात बळी गेलेल्या नातेवाईकांची रिघ अपघातस्थळी सुरू झाली. मात्र त्यानंतरही मेहता अपघातस्थळी पोहचलेच नाहीत. मग अपघात महाडमध्ये पालकमंत्री मुंबईमध्ये अशा टिव्हीवर बातम्याही प्रसारित झाल्या. यादरम्यान राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (एनडीआरएफ), तटरक्षक आणि नौदलाच्या जवानांकडून परिसरात शोधमोहिम सुरू करण्यात आल्याची माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी आणि पोलिस देत होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांसह मंत्री, स्थानिक आमदार आणि विरोधी पक्षनेत्यांनी घटनास्थळी भेट दिली. यादरम्यान मुख्यमंत्री माध्यमांशी संवाद साधत असताना पालकमंत्री मेहता सावित्री नदी किनारी सेल्फी घेताना माध्यमांच्या कॅमेर्यात कैद झाले. त्यामुळे मेहतांवर माध्यमांमधून जोरदार टिकास्त्र सुरू झाले.
जबाबदार माध्यमकर्मी:
महाडमधील महाघाताचे कव्हरेज करण्याबरोबरच घटनेची दाहकता जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माध्यमांच्या प्रतिनिधीवर होती. विविध माध्यमांचे प्रतिनिधी पहाटेच या घटनेचे वृत्तांकन करू लागल्यानंतर खर्या अर्थाने या महाडमधील महाघाताची बातमी सर्वदूर पोहचली. त्यानंतर या अपघातात आपला कुणी असेल या भितीने अनेक भागातून नातेवाईक घटनास्थळी गर्दी करीत होते. माध्यमांचे प्रतिनिधी बचावकार्याचे वृत्तांकन करतानाच येथे जमलेल्या नातेवाईकांशीही संवाद साधत होते. यावेळी कोणतीच माहिती, मदत आणि सहकार्य मिळत नसल्याची तक्रार अनेक नातेवाईक या पत्रकारांकडे करीत होते. आमची ही समस्या आपण सरकारी अधिकारी, मंत्री यांच्यापर्यंत पोहचवावी अशीही विनवणी हे नातेवाईक येथे करीत होते. यावेळी सकाळ माध्यम समूहाच्या साम न्यूज टिव्हीचे प्रतिनिधी मिलिंद तांबे आणि त्यांचे कॅमेरामन नितीन बोढारे या घटनास्थळी सकाळपासूनच वृत्तांकन करीत होते. नातेवाईकांची ही मागणी योग्य असल्याने या दरम्यान घटनास्थळी आलेल्या पालकमंत्री मेहता यांना तांबे यांनी गाठले व अगदी शांतपणे प्रश्न विचारला. मृतांच्या नातेवाईकांना प्रशासनाकडून कुठलीही माहिती मिळत नाही. लांबून आलेल्या नातेवाईकांची कुठलीही सोय महाडमध्ये केली नाही?’ कुणाला माहिती द्यायची असते, फोटो द्यायचे असतात, त्यासाठी काही सोय केली का?’ एकदंर पालकमंत्री म्हणून आपल्या वर नातेवाईकांचा रोष आहे.’ असे प्रश्न विचारताच प्रकाश मेहता यांचा पारा चांगलाच चढला. तुम्ही टीआरपीसाठी काहीही दाखवता, याबाबत माझा पक्ष काय ते बघून घेईल. असं म्हणत त्यांनी पत्रकारालाच दमदाटी सुरु केली. कोसळलेल्या पुलाविषयी आणि पीडितांच्या नातेवाईकांविषयी प्रश्न विचारल्यामुळे मेहता आणि कार्यकर्त्यांचा तोल गेला. इतकंच नव्हे तर, त्यांच्या कार्यकर्त्यांनीही यावेळी दमबाजी करत हे चित्रीकरण थांबवण्यासाठी सामचे पत्रकार मिलींद तांबे यांना धमकावलं. मात्र यात विशेष म्हणजे भाजपचे पनवेल येथील आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मध्यस्तीमुळे तांबे यांच्यावरचा हा प्रसंग थोडक्यात निभावला. संयमी आमदार ठाकूर यांनी कार्यकत्यांच्या रोषापासून तांबेची सुटका केली, त्यांना धन्यवाद. विशेष म्हणजे, यापूर्वीही एका दूरचित्रवाहिनीच्या पत्रकारांसह मेहता यांचा वाद झाला होता आणि आधीचे टीव्हीवरील टीकास्त्र यामुळे मेहतांचा पारा चांगलाच चढलेला होता. हे सर्व चित्रीकरण कॅमेरामन नितीन बोढारे यांनी अचूकपणे टिपले होते.
मुख्यमंत्र्यांकडून मेहतांवर संयमाचा प्रकाश:
मेहता प्रकरणामुळे विविध चॅनेलचे संपादक, प्रतिनिधी, ब्युरो हेड यांच्याबरोबरच राजकिय आणि सामाजिक स्तरांतून निषेधाचा सुर आणि धुर दिसू लागला. त्यानंतर पत्रकारांना धक्काबुक्की करणार्या मेहतांचे माध्यमांमधून आणि मुख्यमंत्र्यांकडून चांगलेच कान उपटले गेले. मात्र एकीकडे लोकांचे जीव गेल्यानंतरही सरकारचा उद्दामपणा आणि धमकावणं सुरुच असल्याचं दिसत असल्याने अवघ्या काही क्षणात मेहतांची धमकावण्याची आणि सेल्फी क्लिप व्हायरल झाल्यावर देश आणि राज्य पातळीवरील सर्व पत्रकार व पत्रकार संघटनांनी याचा निषेध नोंदवला गेला.
एकंदरीत सर्वप्रथम अलिबाग प्रेस असोसिएशन, रायगड प्रेस क्लब, मराठी पत्रकार परिषद, मुंबई प्रेस क्लब, टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनसह राज्यभरातील अनेक संघटना आणि पत्रकारांनी या घटनेचा निषेध करीत मेहतांच्या राजीनाम्याची मागणी सर्वांनी एकजूटीने मुख्यमंत्र्यांकडे केली. पत्रकार जे डे यांच्या हत्येनंतर एवढ्या मोठ्याप्रमाणात पत्रकार व संघटनांनी निषेध नोंदविण्याची ही पहिली वेळ आहे. तरीही मुख्यमंत्री फडणवीस मेहतांवर एवढे मेहरबान का? असा प्रश्न अनुत्तरीतच राहातो.

माध्यमांचा प्रहार; मेहतांची हार:
एबीपी माझा, झी24 तास, आयबीएन लोकमत, जय महाराष्ट्र, महाराष्ट्र1. टिव्ही9 या तसेच अन्य मराठी, हिन्दी आणि इंग्लिश चॅनेलनी या मेहतांच्या वागण्यावर विशेष बुलेटीन चालविली. तसेच सर्वच दैनिकांनी मेहतांच्या असभ्यतेवर प्रकाशझोत टाकला. मेहता....पालक कि मालक ? असा प्रश्न विचारत साम टीव्ही ने तर दिवसभर हा मुद्दा लावून धरला. विनायक गायकवाड यांनी महाराष्ट्र 1 वर थेट मेहता आणि मिलिंद तांबे यांना फोन लाईनवरून एकत्र आणत, मेहतांचा खरपूस समाचार घेतला. तर जय महाराष्ट्रच्या मयांक भागवत आणि निलेश खरे यांनी मेहतांची चांगलीच खरडपट्टी काढली. एबीपीच्या कार्यक्रमातही मेहतांना खडे बोल सुनावले गेले. तर झी 24 तासवरही मेहतांचे लंगडे समर्थन करणार्या राम कदम यांना डॉ. उदय निरगुडकर यांच्या प्रश्नांपुढे पळता भुई थोडी झाली.
मात्र सर्वच माध्यमांवर मेहतांचा राजीनामा हा विषय अत्यंत प्रभावीपणे
मांडला गेला. सहाजिकच माध्यमांचाप्रहार झेलता न आलेल्या मेहतांनी सोशल
साईटवरून याप्रकरणी दिलगीरी व्यक्त करीत हार मानली.

24 तासचे डॉक्टर, त्यांचे जालीम औषध आणि अप्रचाराचा रोग:
रोखठोक भूमिका घेत साधक बाधक चर्चा न करता झी 24 तासच्या डॉ. उदय निरगुडकर यांनी उद्दाम...हो उद्दामच.या रोखठोक कार्यक्रमात भाजपाचे प्रवक्ते राम कदम यांना कोंडीत पकडले. त्यानंतर कदम यांनी सारवासारव करण्याचे अनेक प्रयत्न केले. मेहतांची व्हायरल झालेली क्लिप अर्धवट असल्याचा कांगावा केला. मात्र खरी परिस्थिती म्हणजे मेहता ज्या हॉटेलमध्ये भेट देण्यासाठी आत गेले असता त्यांचे चित्रीकरण तांबे यांच्याकडून झालेच नसल्याच खुलासा झाला, तरिही कदम आपलीच रि ओढताना दिसत होते. अगदीच काही बोलता येत नाही म्हटल्यावर कदम यांनी महाड घटनेतील मेहतांच्या वागण्याचे समर्थन करताना 26/11च्या हल्ल्याचा संदर्भ देत मिडिया चुकीचा असल्याचे दाखवून दिले. म्हणजे मिडीयामुळे ताजमधील सुरक्षितता धोक्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पण दक्ष डॉक्टरांनी कदम यांचा हा मुद्दा ही प्रभावीपणे खोडून काढला. त्यामुळे डॉक्टर आपल्या प्रत्येक आरोपावर जालिम डोस देत असल्याचे पाहून कदम यांची पंचाईत झाली. कदम यांची झालेली पंचाईत पाहून डॉक्टरांनी त्यांना तुमची स्थिती 9 विकेट गेल्यानंतर 10 व्या खेळाडूप्रमाणे झाल्याचा शब्दचिमटा कदम यांना काढला. तो कदम यांच्या चांगलाच जिव्हारी लागला, कारण कदम मेहतांची बाजू सावरण्याचा फसवा प्रयत्न करीत होते हे सर्वजण जाणून होते. मात्र सरकार अनास्थेची आणि मेहतांची दुबळी बाजू सावरणार्या काही तथाकथित मंत्री आणि त्यांच्या हितचिंतकांनी ‘डॉक्टरांच्या 9 विकेट आणि 10 व्या खेळाडू’ या कदम यांना मारलेल्या कोपरखळीचा जाणीवपूर्वक विपर्यास केला. व्हॉटस् अॅप आणि इतर सोशल माध्यमातून डॉक्टरांचा विचका करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मात्र अशा अप्रचारांना डगमगतील ते डॉक्टर कसले? कारण डॉक्टरांनी अंत्यत प्रभावी, समर्थ आणि रोखरोठपणे माध्यमांची बाजू तर मांडलीच होती, पण जनतेसमोर सत्य मांडले होते. चुकिच्या टिकेला पुरेपुर ठरणारे आणि टिकाकारांच्याच शब्दात मार्मिक उत्तर देऊन गप्प करणारे डॉक्टरांचे जालीम औषध सरकारला चांगलेच झोंबले आहे हे मात्र नक्की! त्यामुळे सर्वमाध्यमांबरोबरच झी 24 तासचे एक पाऊल पुढे पडले आहे.
माध्यमकर्मी मिलिंद आणि मिडिया सपोर्ट:
नवखे पत्रकार बुम हातात घेऊन काहीही विचारतात अशी प्रतिक्रिया मेहतांनी एका चॅनेलला दिली. त्यामुळे बुमला बंबुर्डे म्हणणार्या मेहतांना राजकारणात 6 वेळा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर आणि 40 वर्षे राजकारण करूनही बुम म्हणजे काय माहिती नसेल तर मिलिंद तांबे कोण हे कसे कळेल. या घटनेनंतर पत्रकार मिलिंद यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली. की कोण आहे मिलिंद ? अगदी गेली अनेक वर्षे मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि रायगड विभागात प्रतिनिधी म्हणून मिलिंद कार्यरत आहे. याविभागातील प्रत्येक घटनेवर बारिक लक्ष, ऊत्तम जनसंपर्क असलेला आणि पञकारीतेचा प्रदीर्घ अनुभव असलेला हा सजग पत्रकार. मिलिंद या नावाप्रमाणे अगदी शांत, मितभाषी, संयमी आणि सुस्वभावी असा माणूस. त्यामुळे सहाजिकच मिलिंदला अनेक ठिकाणांहून फोनाफोनी सुरू झाली. त्यातच चॅनेलचे फोनो सुरू असल्याने मिलिंदला एका क्षणाचीही उसंत मिळत नव्हती. अगदी पत्नीचा फोनही मिलिंद रिसीव्ह करू शकला नाही. त्याठिकाणी असताना अगदी रात्री उशीरा फोनवरून याबद्दल चर्चा झाल्यानंतर या घटनेचा तपशिल समजला. त्यानंतर मिलिंदने सर्व टिव्ही, प्रिंट, ऑनलाईन माध्यमकर्मी, पत्रकार, संपादक, हितचिंतक, मिञपरिवार आणि विशेष करून आमदार प्रशांत ठाकूर यांना धन्यवाद दिले. त्यातच संपादक संजय आवटे यांनी हे प्रकरण गांभिर्यपूर्वक हाताळत रायगड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला तर दुसरीकडे सर्व पत्रकार व पत्रकार संघटनांच्यावतीने मुंबई प्रेस क्लब आणि टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशने मुख्यमंत्र्यांकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे.
पञकारीतेवर हल्ला आणि संरक्षण :
महाडमधील महाघातानंतर पञकारांच्याबद्दल हेतूपुरस्सर काही मजकुर प्रसारित होत आहे. तो कोण करतोय हे काय लपून राहिलेलं नाही. विषयांतर करण्याचा तो एक अपूर्ण, निष्फळ प्रयत्न आहे. त्यामुळे यानिमित्ताने मागील काही गोष्टींची आठवण येथे करून आवश्यक वाटते. पत्रकार म्हणजे कोणी सुपरमॅन नाही. तोही एक माणूसच आहे. तो आपले काम प्रामाणिकपणे करीत असतो. कव्हरेजसाठी जाणारा पत्रकार तिथे मौजमजा करण्यासाठी जात नाही. पञकार म्हणजे सेलिब्रिटी, त्यांची कशी सरबराई राखली जात असेल असाही एक गैरसमज सामान्य जनतेत आहे, मात्र हे खरे नाही. याउलट कोणतीही घटना घडली की आहे त्या परिस्थितीत ते कव्हरेज करायला त्याला हजर व्हावे लागते. त्यामुळे मोर्चा, दुर्घटना, दंगलीच्यावेळी गर्दीमुळे होणारी धक्काबुक्की, जिवाचा धोका हे सर्व सांभाळून काम करावं लागतं. काही वर्षांपूर्वी मालवणमध्ये निखिल वागळे सरांवर भ्याड हल्ला झाला होता. तेव्हा मी त्यांच्या सोबत होतो. तर काही वर्षांपूर्वी शिवाजी पार्कवरील बसपाच्या सभेत अचानक एका जमावानं शैलेश मोहिते, एनडीटीव्हीचे प्रसाद काथे या पञकारांना घेरून हल्ला केला होता. तर ठाणे येथे शिवसेनेचे तत्कालिन जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या अकाली मृत्यूनंतर जमाव पेटून उठला. त्यावेळच्या स्टार आणि आत्ता एबीपी न्यूजचे पत्रकार जितेंद्र दीक्षित आणि त्यांच्या टीमला तर जीवाचा धोका निर्माण झाला होता. गुजरात दंगलीच्यावेळी पञकार रवींद्र आंबेकर यांनाही भयानक परिस्थितीला सामोरे जावे लागले होते. हल्लीच्या जैतापूर आंदोलनाच्यावेळी पञकार पंकज दळवी यांना संतप्त जमावाचा सामना करावा लागला. आत्ताच्या आझाद मैदान हिंसाचारात पञकार विनोद जगदाळे यांना शस्त्राचा धाक दाखवण्यात आला. महिला पञकार काम्या भट्टाचार्य, उर्वशी खोना, मयूरी डोंगरे, सामनाच्या मनिषा अशा अनेकींना वेगवेगळे अनुभव आले. बाबरी मशीद प्रकरण निकालावेळी मी ही थरार अनुभवला. तर उर्वशी खोनासोबत आरे कॉलनीतील स्टिंगमधून आम्ही निसटलो होतो . तर झीचे अमित जोशी यांच्यावर आगीचे कव्हरेज करताना झालेला हल्ला प्राणघातक होता. अशा राज्यातील अनेक पञकारांना जीवघेणे अनुभव आलेत. त्यांचे संरक्षण कोण करणार?
विरोधी पक्षात असताना पत्रकारांच्या सुरक्षिततेबाबत आघाडी सरकारशी दोन हात करणारेच आमदार आज सरकारमध्ये कार्यक्षम मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे महाड प्रकरणाबाबत बेजबाबदार सरकार आता यापुढे तरी किती जबाबदारपणे वागते ? , बघु त्यांना तरी कळते का, दिसते का, सुचते का आणि पचते का ? बांधिलकी मिडियाची आणि दादागिरी मस्तवाल मेहतांची! दिनांक:05ऑगस्ट 2016;10:00

Saturday, June 6, 2015
बनावट सॉफ्टवेअरव्दारे रेल्वे तिकिटांचा काळाबाजार?
Labels:
BLACK,
MONEY,
MUMBAI POLICE,
Railway,
RPF,
TICKET,
TICKET SCAM
हजारो पावले भरकटलेली
Labels:
CRIME,
CRIME DAIRY,
FIR,
GRP,
MANTRALAY,
MARATHI,
MUMBAI POLICE,
POLICE
Subscribe to:
Posts (Atom)